भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १२५ :
इतरांचे जीवित किंवा व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणारी कृती :
कलम : १२५
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : ज्यामुळे मानवी जीवित, इत्यादी धोक्यात येईल अशा कृतीने दुखापत पोचवणे.
शिक्षा : ३ महिन्यांचा कारावास, किंवा २५०० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———-
कलम : १२५ (क) (अ)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : जिथे दुखापत हाईल.
शिक्षा : सहा महिने कारावास किंवा पाच हजार द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : जिला दुखापत पोचवण्यात आली ती व्यक्ती.
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———-
कलम : १२५ (ख) (ब)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : जिथे जबर दुखापत होईल.
शिक्षा : तीन वर्ष कारावास किंवा दहा हजार रुपए पर्यंत द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : जिला दुखापत पोचवण्यात आली ती व्यक्ती.
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
जो कोणी मानवी जीवित किंवा इतरांची व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात येईल इतक्या बेदरकारपणे किंवा हयगयीने कोणतीही कृती करील त्याला, तीन महिन्यापर्यंन्त असू शकेल इतक्या मुदतीची दोन्ही पैकी कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा दोन हजार पाचशे (२५००) रुपयांपर्यंन्त असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील, परंतु –
(a) क) (अ) जिथे दुखापत पोचवली जाते, त्याला सहा महिन्यापर्यंन्त असू शकेल इतक्या मुदतीची दोन्ही पैकी कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा पाच हजार रुपयांपर्यंन्त असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील;
(b) ख) (ब) जिथे जबर दुखापत पोचवली जाते, त्याला तीन वर्षापर्यंन्त असू शकेल इतक्या मुदतीची दोन्ही पैकी कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा दहा हजार रुपयांपर्यंन्त असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील;