भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २७२ :
जीवितास धोकादायक असलेल्या रोगाचा संसर्ग पसरवण्याचा संभव असलेली घातकी कृती :
कलम : २७२
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : जीवितास धोकादायक असलेल्या कोणत्याही रोगाचा संसर्ग जीमुळे पसरण्याचा संभव असल्याचे माहीत आहे अशी कोणतीही घातकी कृती करणे.
शिक्षा : २ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड, किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
जिच्यामुळे जीवितास धोकादायक असलेल्या कोणत्याही रोगाचा संसर्ग पसरण्याचा संभव असून ते स्वत:ला माहीत आहे किंवा तसे समजण्यास कारण आहे अशी कोणतीही कृती जो कोणी घातकीपणाने करील त्याला, दोन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा, किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.
Pingback: Ipc कलम २७० : जीवितास धोकादायक असलेल्या रोगाचा संसर्ग