भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ८६ :
क्रर वागणूक याची व्याख्या :
कलम ८५ च्या प्रयोजनार्थ क्रूर वागणूक देणे याचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे-
(a) क) ज्यामुळे त्या स्त्रीला आत्महत्या करणे क्रमप्राप्त होईल अथवा, तिला दुखापत होईल, अथवा तिच्या जीविताला, अंगाला किंवा स्वास्थ्याला (मानसिक किंवा शारीरिक) धोका निर्माण होईल, अशा तऱ्हेचे कोणतेही बुद्धिपुरस्सर वर्तन.
(b) ख) जेव्हा त्या स्त्रीवर किंवा तिच्याशी संबंधित असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर कोणत्याही मालमत्तेची किंवा मूल्यवान रोख्याची बेकायदेशीर मागणी पूर्ण करण्याची जबरदस्ती करण्याच्या हेतूने, अथवा अशी मागणी पूर्ण करण्यात तिच्याकडून किंवा तिच्याशी संबंधित असलेल्या व्यक्तीकडून कसूर झाल्याबद्दल तिला सतावले जाते तेव्हा, अशी सतावणूक.