Bns 2023 कलम ८५ : एखाद्या स्त्रीच्या पतीने किंवा पतीच्या नातेवाईकाने तिला क्रूर वागणूक देणे :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ८५ :
एखाद्या स्त्रीच्या पतीने किंवा पतीच्या नातेवाईकाने तिला क्रूर वागणूक देणे :
कलम : ८५
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : विवाहित स्त्रीशी कू्ररपणा केल्याबद्दल शिक्षा.
शिक्षा : ३ वर्षाचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र-अपराध घडल्याची माहिती, अपराधामुळे नुकसान पोचलेल्या व्यक्तीने अथवा तिच्याशी रक्ताच्या किंवा सोयरिकीच्या किंवा दत्तकाच्या नात्याने संबंधित असलेल्या व्यक्तीने अथवा असा कोणताही नातेवाईक नसेल तर या संबंधात शासनाने अधिसूचित केले असेल अशा वर्गातील किंवा, प्रकरणपरत्वे, प्रवर्गातील कोणत्याही लोकसेवकाने पोलीस ठाण्याच्या अंमलदार अधिकाऱ्याला दिली तर.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
जो कोणी एखाद्या स्त्रीचा पती असून, किंवा पतीचा नातेवाईक असून, अशा स्त्रीला क्रूर वागणूक देईल, त्याला तीन वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
स्पष्टीकरण :
या कलमाच्या प्रयोजनार्थ क्रूर वागणूक देणे याचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे-
(a) क) ज्यामुळे त्या स्त्रीला आत्महत्या करणे क्रमप्राप्त होईल अथवा, तिला दुखापत होईल, अथवा तिच्या जीविताला, अंगाला किंवा स्वास्थ्याला (मानसिक किंवा शारीरिक) धोका निर्माण होईल, अशा तऱ्हेचे कोणतेही बुद्धिपुरस्सर वर्तन.
(b) ख) जेव्हा त्या स्त्रीवर किंवा तिच्याशी संबंधित असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर कोणत्याही मालमत्तेची किंवा मूल्यवान रोख्याची बेकायदेशीर मागणी पूर्ण करण्याची जबरदस्ती करण्याच्या हेतूने, अथवा अशी मागणी पूर्ण करण्यात तिच्याकडून किंवा तिच्याशी संबंधित असलेल्या व्यक्तीकडून कसूर झाल्याबद्दल तिला सतावले जाते तेव्हा, अशी सतावणूक.

Leave a Reply