भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ७५ :
लैंगिक सतावणूक :
कलम : ७५
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : पोटकलम (१) च्या खंड (एक) किंवा खंड (दोन) किंवा खंड (तीन) मध्ये विनिर्दिष्ट लैंगिक सतावणूक व लैंगिक सतावणुकीसाठी शिक्षा.
शिक्षा : ३ वर्षापर्यंतचा कठोर कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
अपराध : (३) पोटकलम (१) च्या खंड (चार) मध्ये विनिर्दिष्ट केलेला अपराध
शिक्षा : १ वर्षापर्यंतचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
१) एखाद्या पुरुष, पुढीलपैकी कोणतीही कृती करील तर तो, लैंगिक सतावणुकीच्या अपराधासाठी दोषी ठरेल-
एक) शारीरिक जवळीक व नको असलेली व उघडउघड लैंगिक गोष्टीची मागणी करणारी मैत्री; किंवा
दोन) लैंगिक संबंधाची मागणी किंवा विनंती करणे; किंवा
तीन) स्त्रीच्या इच्छेविरुद्ध, बलपूर्वक संभोगदर्शक देखावे दाखवणे; किंवा
चार) लैंगिक स्वरुप दिलेले शेरे मारणे.
२) जी व्यक्ती, पोटकलम (१) च्या खंड (एक) किंवा खंड (दोन) किंवा खंड (तीन) मध्ये विनिर्दिष्ट केलेला अपराध करील अशा कोणत्याही व्यक्तीला तीन वर्षांपर्यंत असू शकेल अशी कठोर कारावासाची किंवा द्रव्यदंडाची किंवा या दोन्ही शिक्षा होतील.
३) जी व्यक्ती, पोटकलम (१) च्या खंड (चार) मध्ये विनिर्दिष्ट केलेला अपराध करील अशा कोणत्याही व्यक्तीला एक वर्षापर्यंत असू शकेल अशा कोणत्याही एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.