Bns 2023 कलम ६९ : फसवणूकीच्या उपायांनी (प्रवंचनापूर्ण साधन) नियोजकाद्वारे मैथुन, इत्यादी :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ६९:
फसवणूकीच्या उपायांनी (प्रवंचनापूर्ण साधन) नियोजकाद्वारे मैथुन, इत्यादी :
कलम : ६९
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : फसवणूकीच्या उपायांनी (प्रवंचनापूर्ण साधन) नियोजकाद्वारे मैथुन, इत्यादी.
शिक्षा : १० वर्षापर्यंत कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
जो कोणी, फसव्या मार्गाने किंवा कपटपूर्ण साधनांद्वारे (प्रवंचनापूर्ण साधन), एखाद्या स्त्रीशी, जे वचन पूर्ण करण्याच्या हेतु शिवाय, लग्न करण्याचे वचना द्वारे, बलात्काराचा अपराध ठरत नाही असा लैंगिक समागम करतो, त्याला दहा वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या अवधीची दोन्ही पैकी कोणत्याही एका वर्णनाची कारावासाची शिक्षा होईल, आणि तो दंडासही पात्र असेल.
स्पष्टीकरण :
फसव्या माध्यमांमध्ये (प्रवंचनापूर्ण साधन) यात नोकरी किंवा पदोन्नती, प्रलोभन किंवा ओळख लपवून लग्नाचे खोटे वचन समाविष्ट आहे.

Leave a Reply