Bns 2023 कलम ६६ : पीडित व्यक्तीच्या मृत्यूस कारण ठरणे किंवा तिची टिकून राहणारी वनस्पतीवत अवस्था होण्यात पर्यवसान होणे यासाठी शिक्षा :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ६६:
पीडित व्यक्तीच्या मृत्यूस कारण ठरणे किंवा तिची टिकून राहणारी वनस्पतीवत अवस्था होण्यात पर्यवसान होणे यासाठी शिक्षा :
कलम : ६६
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : बलात्कार आणि पीडित व्यक्तीच्या मृत्यूत किंवा टिकून राहाणाऱ्या वनस्पतीवत स्थितीत पर्यवसान होईल अशी इजा पोचवणाऱ्या व्यक्तीस.
शिक्षा : किमान २० वर्षांचा किंवा आजीवन कारावास म्हणजे त्या व्यक्तीच्या नैसर्गिक जीवनाच्या उर्वरित कालासाठी सश्रम कारावास किंवा देहांताची शिक्षा.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
जो कोणी, कलम ६४ चे पोटकलम (१) किंवा पोटकलम (२) अन्वये शिक्षा योग्य असलेला अपराध करील आणि अशी कृती करताना त्या महिलेला अशा जखमा करील की त्यामुळे तिचा मृत्यू होईल किंवा त्या महिलेची सतत टिकून राहणारी वनस्पतीवत् अवस्था होईल, त्याला वीस वर्षापेक्षा कमी नसेल; परंतु आजीवन कारावासापर्यंत असू शकेल म्हणजेच त्या व्यक्तीच्या नैसर्गिक जीवनाच्या उर्वरित काळापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची सश्रम कारावासाची किवा देहांताची शिक्षा होईल.

Leave a Reply