Bns 2023 कलम ५ : शिक्षा परिवर्तित करुन सौम्य करणे :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ५ :
शिक्षा परिवर्तित करुन सौम्य करणे :
समुचित शासन (योग्य ते शासन) अपराध्याच्या संमतीशिवाय भारतीय नागरी संरक्षण संहिता २०२३ (२०२३ चा ४६) याच्या कलम ४७४ अनुसार, या संहितेखालील कोणत्याही शिक्षेला अन्य कोणत्याही शिक्षेत परिवर्तित करुन सौम्य करु शकेल.
स्पष्टीकरण :
या कलमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन (सरकार) याच अर्थ,-
(a) क) (अ) जेथे शिक्षादेश हा मृत्यूचा शिक्षादेश असेल किंवा संघराज्याच्या शासनशक्तीच्या व्याप्तीत येणाऱ्या बाबीसंबंधीच्या कोणत्याही कायद्याविरुद्ध घडलेल्या अपराधाबद्दल असेल त्या प्रकरणी केंद्र शासन; आणि
(b) ख) (ब) जेथे शिक्षादेश हा (मग तो मृत्यूचा असो वा नसो) राज्याच्या शासनशक्तीच्या व्याप्तीत येणाऱ्या बाबींसंबंधीच्या कोणत्याही कायद्याविरुद्ध घडलेल्या अपराधाबद्दल असेल त्या प्रकरणी, ज्या राज्यामध्ये अपराध्यास शिक्षा ठोठावण्यात आली असेल त्या राज्याचे राज्य शासन.

This Post Has One Comment

Leave a Reply