भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ५२ :
अपप्रेरित (चिथावणी दिलेल्या) कृतीबद्दल आणि प्रत्यक्षात केलेल्या कृतीबद्दल अशा दोन्ही अपराधांच्या एकत्रित शिक्षेबद्दल अपप्रेरक (चिथावणी देणारा) केव्हा पात्र (जबाबदार) असतो :
कलम : ५२
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : अपप्रेरित (चिथावणी दिलेल्या) कृतीबद्दल आणि प्रत्यक्षात केलेल्या कृतीबद्दल अशा दोन्ही अपराधांच्या एकत्रित शिक्षेबद्दल अपप्रेरक (चिथावणी देणारा) केव्हा पात्र (जबाबदार) असतो.
शिक्षा : ज्या अपराधाला अपप्रेरणा असेल तीच
दखलपात्र / अदखलपात्र : अपप्रेरित अपराध दखलपात्र किंवा अदखलपात्र असेल त्यानुसार.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अपप्रेरित अपराध जामीनपात्र किंवा अजामीनपात्र असेल त्यानुसार.
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : अपप्रेरित अपराध ज्या न्यायालयात विचारणीय असेल ते न्यायालय.
——–
जर कलम ५१ मधील ज्या कृत्याकरिता अपप्रेरक (चिथावणी देणारा) पात्र (जबाबदार) असेल आणि ते कृत्य चिथावणी दिलेल्या कृत्यापेक्षा अधिक वेगळे असेल आणि ते कृत्य जर स्वतंत्रपणे अपराध घडत असेल तर अपप्रेरक (चिथावणी देणारा) त्यांपैकी प्रत्येक अपराधाकरिता शिक्षेस पात्र असतो.
उदाहरण :
लोक सेवकाकडून होणाऱ्या अटकावणीस बळाने प्रतिकार करण्यास (क) हा (ख) ला चिथावणी देतो (ख) परिणामी त्या अटकावणीस प्रतिकार करतो. प्रतिकार करताना (ख) अटकावणी बजावण्याची कार्यवाही करणाऱ्या अधिकाऱ्याला इच्छापूर्वक जबर दुखापत करतो. (ख) ने अटकावणीला प्रतिकार करण्याचा व इच्छापूर्वक जबर दुखापत करण्याचा असे दोन्ही अपराध केलेले असल्यामुळे, (ख) या दोन्ही अपराधांबद्दलच्या शिक्षेस पात्र आहे ; आणि जर अटकावणीस प्रतिकार करताना (ख) इच्छापूर्वक जबर दुखापत करण्याचा संभव आहे याची (क) ला जाणीव होती असे असेल तर, (क) सुद्धा त्यांपैकी प्रत्येक अपराधाबद्दल शिक्षेस पात्र होईल.
Pingback: Ipc कलम ११२ : अपप्रेरित कृतीबद्दल आणि प्रत्यक्षात केलेल्या