Bns 2023 कलम ४५ : एखाद्या गोष्टीचे (कृतीचे) अपप्रेरणा (चिथावणी) :

भारतीय न्याय संहिता २०२३
प्रकरण ४ :
दुष्प्रेरण, आपराधिक षड्यंत्र आणि प्रयत्ना विषयी :
कलम ४५ :
एखाद्या गोष्टीचे (कृतीचे) अपप्रेरणा (चिथावणी) :
जेव्हा एखादी व्यक्ती-
(a) क) (अ) एखादी गोष्ट (कृती) करण्यास कोणत्याही व्यक्तीला चिथावणी देते तेव्हा, किंवा
(b) ख) (ब) ती कृती करण्याकरिता अन्य एका किंवा अधिक व्यक्तीबरोबर कोणत्याही कटात सामील झाली असता, त्या कटाला अनुसरुन (धरून) आणि ती गोष्ट (कृती) करण्यासाठी एखादी कृती किंवा अवैध अकृती घडून येते तेव्हा; किंवा
(c) ग) (क) ती गोष्ट (कृती) करण्याकरिता कोणत्याही कृतीद्वारे किंवा अवैध अकृतीद्वारे उद्देशपूर्वक सहाय्य करते तेव्हा,
तिने ती गोष्ट (कृती) करण्याकरिता अपप्रेरणा (चिथावणी) दिली असे म्हटले जाते.
स्पष्टीकरण १ :
जी व्यक्ती एखादे महत्वाचे तथ्य प्रकट करण्यास ती बद्ध (बांधलेली) असते, असे असताना बुध्दिपुरस्सर अपवेदन (चुकीचे मार्गदर्शन) करते, किंवा बुद्धिपुरस्सर लपवून इच्छापूर्वक एखादी गोष्ट (कृती) करविते किंवा घडवून आणते किंवा करण्याचा किंवा घडवून आणण्याचा प्रयत्न करते, तर तिने ती गोष्ट करण्यास चिथावणी दिली असे म्हटले जाते.
उदाहरण :
(क) या लोकसेवकास (य) यास अटक करण्याकरिता न्यायालयाकडून वॉरंटाद्वारे अधिकार मिळाला आहे, (ख) ला ते तथ्य आणि तसेच (ग) हा (य) नाही हेही माहीत असताना, तो (ग) हा (य) आहे असे इच्छापूर्वक (क) यास चुकीचे मार्गदर्शन करतो, आणि त्याद्वारे (ग) ला उद्देशपूर्वक (क) करवी अटक करवतो. याबाबतीत (ख) ने (ग) ला अटक करवण्याच्या कामी चिथावणी देऊन अपप्रेरणा दिली असे होते.
स्पष्टीकरण २:
जो कोणी एखादी कृती करण्यापूर्वी किंवा करते वेळी ती कृती करणे सोपे जावे याकरिता एखादी गोष्ट (कृती) करतो आणि त्यामुळे ती कृती करणे सोपे करतो, तर तो ती कृती करण्याच्या कामी सहाय्य करतो असे म्हटले जाते.

This Post Has One Comment

Leave a Reply