भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ४३ :
मालमत्तेचा खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क सुरू होणे व चालू राहणे:
मालमत्तेचा खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क,-
(a) क) (अ) मालमत्तेला धोका असल्याची वाजवी धास्ती निर्माण होते तेव्हा सुरू होतो.
(b) ख) (ब) चोरीपासून अपराधी हा मालमत्तेसह काढता पाय घेईपर्यंत अथवा सरकारी अधिकाऱ्यांंची मदत मिळविण्यात येईपर्यंत, किंवा अशी मालमत्ता परत मिळविण्यात येईपर्यंत चालू राहतो.
(c) ग) (क) जबरी चोरीपासून हा, जोपर्यंत अपराधी कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू किंवा तिला दुखापत, किंवा गैरनिरोध (अन्यायाने प्रतिबंध) करीत आहे तोपर्यंत, किंवा करण्याचा प्रयत्न करीत आहे तोपर्यंत अथवा जोपर्यंत तात्काळ मृत्यूचे किंवा तात्काळ दुखापतीचे किंवा व्यक्तिगत निरोधाचे (प्रतिबंधाचे) भय असते तोपर्यंत चालू राहतो.
(d) घ) (ड) फौजदारीपात्र अतिक्रमण किंवा आगळीक (अपक्रिया) यापासून, जोपर्यंत अपराधी (आरोपी) फौजदारीपात्र अतिक्रमण करण्याचे चालू ठेवतो तोपर्यंत चालू राहतो.
(e) ङ) (इ) सूर्यास्तानंतर आणि सूर्यादयापूर्वी घरफोडीपासून, जोपर्यंत अशा घरफोडीं मुळे सुरू झालेले गृह-अतिक्रमण चालू असेपर्यंत चालू राहतो.
Pingback: Ipc कलम १०५ : मालमत्तेचा खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क सुरू