Bns 2023 कलम ३९ : असा हक्क मृत्युहून अन्य अपाय करण्याइतपत केव्हा व्यापक असतो :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ३९ :
असा हक्क मृत्युहून अन्य अपाय करण्याइतपत केव्हा व्यापक असतो :
जर तो अपराध लगतपूर्व कलम ३८ यात नमूद केलेल्यांपैकी कोणत्याही वर्णनाचा नसेल तर, शरीराचा खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क इच्छापूर्वक हल्लेखोराचा मृत्यू घडवून आणण्याइतपत व्यापक नसतो; परंतु कलम ३७ मध्ये उल्लेखिलेल्या निर्बंधांच्या अधीनतेने, तो हक्क हल्लेखोराला मृत्युहून अन्य कोणताही अपाय इच्छापूर्वक करण्याइतपत व्यापक असतोच.

This Post Has One Comment

Leave a Reply