Bns 2023 कलम ३६ : मनोविकल इत्यादी व्यक्तींच्या कृतीपासून खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ३६ :
मनोविकल इत्यादी व्यक्तींच्या कृतीपासून खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क :
जी कृती एरवी एखादा विवक्षित अपराध ठरली असती ती करणाऱ्या व्यक्तीच्या बालवयामुळे, तिच्या ठायी परिपक्व समजशक्तीचा अभाव असल्यामुळे, तिच्या मनोविकलतेमुळे किंवा ती नशेत असल्यामुळे, अथवा तिचा काही गैरसमज झाला असल्यामुळे ती कृती अपराध होत नसेल तेव्हा, प्रत्येक व्यक्तीला ती कृती अपराध असती, तर त्या कृतीपासून खासगीरीत्या बचाव करण्याचा जो हक्क मिळाला असता तोच हक्क असतो.
उदाहरणे :
(a) क) (य) मनोविकल व्यक्ति (क) ला ठार मारण्याचा प्रयत्न करतो; (य) कोणत्याही अपराधाबद्दल दोषी नाही, पण (क) ला (य) शहाणा असता तर, जो खाजगीरीत्या बचाव करण्याचा हक्क मिळाला असता तोच हक्क आहे.
(b) ख) (क) ज्या घरात प्रवेश करण्यास विधित: (कायद्याने) हक्कददार आहे त्या घरात तो रात्रीच्या वेळी प्रवेश करतो. (क) ला प्रामाणिकपणे घरफोड्या समजून (य) त्याच्यावर हल्ला करतो. येथे गैरसमजाने (क) वर हल्ला चढवल्यामुळे (य) काही अपराध करत नाही. पण (क) ला (य) ने त्या गैरसमजाने ते कृत्य केले नसते तर (य) पासून खाजगीरीत्या बचाव करण्याचा जो हक्क मिळाला तो हक्क (क) ला आहे.

This Post Has One Comment

Leave a Reply