Bns 2023 कलम ३२७ : रेल्वे, विमान, मजली जलयान किंवा २० टन ओझे भरलेले जलयान नष्ट करण्याच्या अथवा असुरक्षित करण्याच्या उद्देशाने आगळीक करणे:

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ३२७ :
रेल्वे, विमान, मजली जलयान किंवा २० टन ओझे भरलेले जलयान नष्ट करण्याच्या अथवा असुरक्षित करण्याच्या उद्देशाने आगळीक करणे:
कलम : ३२७ (१)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : मजली जलयान किंवा २० टन बारदान भरलेले जलयान नष्ट करण्याच्या अथवा असुरक्षित करण्याच्या उद्देशाने आगळीक करणे.
शिक्षा : १० वर्षांचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
कलम : ३२७ (२)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : मागील पोटकलम (१) मध्ये वर्णिलेली आगळीक विस्तव किंवा स्फोटक पदार्थ याद्वारे करण्यात आल्यास.
शिक्षा : आजीवन कारावास किंवा १० वर्षांचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
१) जर कोणी कोणतेही रेल्वे, विमान, मजली जलयान अथवा २० टन किंवा त्याहून अधिक ओझे भरलेले कोणतेही जलयान यांच्याबाबत आगळीक केली आणि त्यामागे ते नष्ट करण्याचा किंवा असुरक्षित करण्याचा त्याचा उद्देश असेल, अथवा त्यायोगे ते नष्ट होण्यास किंवा असुरक्षित होण्यास आपण कारण होण्याचा संभव असल्याची त्याला जाणीव असेल तर, त्याला दहा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
२) जो कोणी, विस्तव (आग) किंवा कोणताही स्फोटक पदार्थ याच्याद्वारे पोटकलम (१) मध्ये वर्णन केलेली अशी आगळीक करील, किंवा अशी आगळीक करण्याचा प्रयत्न करील त्याला आजन्म कारावासाची किंवा दहा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.

Leave a Reply