भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ३१ :
सद्भावपूर्वक केलेले निवेदन :
सद्भावपूर्वक केलेले कोणतेही निवेदन ज्या व्यक्तीला ते करण्यात आलेले आहे तिच्या हितासाठी केलेले असेल तर, त्या व्यक्तीला होणाऱ्या कोणत्याही अपायामुळे ते अपराध होत नाही.
उदाहरण :
(क) हा शल्यचिकित्सक एका रुग्णाला, तो जगू शकणार नाही हे आपले मत निवेदन करतो. त्या धक्क्यामुळे रुग्ण मृत्यू पावतो. या निवेदनामुळे रुग्णाचा कदाचित मृत्यू घडेल असा संभव आहे याची (क) ला जाणीव असली तरी, त्याने काहीही अपराध केलेला नाही.
Pingback: Ipc कलम ९३ : सभ्दावपूर्वक केलेले निवेदन :