भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ३१३ :
चोरांच्या टोळीपैकी असल्याबद्दल शिक्षा :
कलम : ३१३
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : नित्यश: चोरी करण्यासाठी संघटित झालेल्या व्यक्तींच्या भटक्या टोळींपैकी असणे.
शिक्षा : ७ वर्षांचा सश्रम कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
जो कोणी नित्यश: चोरी किंवा जबरी चोरी करण्यासाठी संघटित झालेल्या व्यक्तींचा कोणत्याही टोळीपैकी-ठग किंवा दरोडेखोर यांची टोळी नव्हे- असेल त्याला, सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची सश्रम कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.