Bns 2023 कलम ३१० : दरोडा :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ३१० :
दरोडा :
कलम : ३१० (२)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : दरवडा.
शिक्षा : आजीवन कारावास किंवा १० वर्षांचा सश्रम कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
कलम : ३१० (३)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : दरवड्यामध्ये खून.
शिक्षा : मृत्यू, आजीवन कारावास किंवा किमान १० वर्षांचा सश्रम कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
कलम : ३१० (४)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : दरवडा घालण्याची पूर्वतयारी करणे.
शिक्षा : १० वर्षांचा सश्रम कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
कलम : ३१० (५)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : दरवडा घालण्यासाठी एकत्र जमलेल्या पाच किंवा अकि व्यक्तींपैकी एक असणे.
शिक्षा : ७ वर्षांचा सश्रम कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
कलम : ३१० (६)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : नित्यश: दरवडे घालण्यासाठी संघटित झालेल्या व्यक्तींच्या टोळीपैकी असणे.
शिक्षा : आजीवन कारावास किंवा १० वर्षांचा सश्रम कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
१) जेव्हा पाच किंवा त्याहून अधिक व्यक्ती संयुक्तपणे जबरी चोरी करतात किंवा करण्याचा प्रयत्न करतात, अथवा संयुक्तपणे जबरी चोरी करणाऱ्या किंवा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती किंवा तेथे उपस्थित राहून अशा जबरी चोरी करण्याच्या कामी किंवा प्रयत्नामध्ये मदत करणाऱ्या व्यक्ती मिळून एकूण संख्या पाच किंवा त्याहून अधिक असेल तेव्हा, याप्रमाणे जबरी चारी करणारी, प्रयत्न करणारी, किंवा मदत करणारी प्रत्येक व्यक्ती दरोडा घालते असे म्हटले जाते.
२) जो कोणी दरवडा घालील त्याला आजीवन कारावासाची शिक्षा दहा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची सश्रम कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
३) संयुक्तपणे दरोडा घालणाऱ्या पाच किंवा अधिक व्यक्तींपैकी कोणत्याही व्यक्तीने जर याप्रमाणे दरोडा घालताना खून केला तर, त्यांच्यापैकी प्रत्येक व्यक्तीला, मृत्यूची किंवा आजन्म कारावासाची किंवा दहा वर्षांपेक्षा कमी नसेल इतक्या मुदतीची सश्रम कारावासाची शिक्षा होईल व ती द्रव्यदंडासही पात्र होईल.
४) जो कोणी दरोडा घालण्यासाठी कोणत्याही प्रकारे पूर्वतयारी करील त्याला, दहा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची सश्रम कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
५) जो कोणी दरोडा घालण्यासाठी पाच किंवा अधिक व्यक्तींपैकी एक असेल त्याला, सात वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची सश्रम कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
६) जो कोणी नित्यश: दवरडे घालण्यासाठी संघटित झालेल्या व्यक्तींच्या टोळीपैकी असेल त्याला आजन्म कारावासाची, किंवा दहा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची सश्रम कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.

Leave a Reply