भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २९ :
ज्या कृती त्यांच्यामुळे होणाऱ्या अपायाच्या निरपेक्षतेने अपराध आहेत त्या वगळणे :
ज्या कृती संमती देणाऱ्या किंवा जिच्या वतीने संमती दिली जाते त्या व्यक्तीला त्यामुळे जो कोणताही अपाय घडेल, किंवा घडावा असा उद्देश असेल, किंवा घडण्याचा संभव असल्याचची जाणीव असेल त्या अपायामुळे नव्हे तर स्वतंत्रपणे अपराधध ठरतात, त्यांना कलमे २५, २६ आणि २७ यांमधील अपवाद लागू होणार नाहीत.
उदाहरण :
गर्भस्त्राव (गर्भपात) घडवून आणणे (एखाद्या स्त्रीचे प्राण वाचविण्यासाठी तो सद्भावपूर्वक घडवून आणलेला असेल तर गोष्ट वेगळी) हा, त्यामुळे त्या स्त्रीला जो कोणताही अपाय घडेल किंवा घडावा असा उद्देश असेल त्यामुळे नव्हे तर स्वतंत्रपणे अपराध आहे म्हणून, तो अशा अपायामुळे अपराध होत नाही, आणि असा गर्भस्त्राव घडवून आणण्यास त्या स्त्रीने किंवा तिच्या पालकाने दिलेल्या संमतीमुळे त्या कृतीचे समर्थन होत नाही.
Pingback: Ipc कलम ९१ : ज्या कृती त्यांच्यामुळे होणाऱ्या अपायाच्या..