भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २८ :
भयापोटी किंवा गैरसमजापोटी संमती दिली असल्याची जाणीव असणे :
(a) क) (अ) जेव्हा दुखापत होण्याच्या भयापोटी किंवा एखाद्या तथ्याबाबतच्या गैरसमजापोटी संमती देण्यात आलेली असून, अशा भयामुळे किंवा गैरसमजामुळे ती संमती देण्यात आली हे ती कृती करणारी व्यक्ती जाणून असेल किंवा असे समजण्यास कारण असेल तर; अथवा
(b) ख) (ब) जर एखाद्या व्यक्तीने संमती दिलेली असून, आपण ज्याला संमती देत आहोत त्याचे स्वरुप व परिणाम समजण्यास ती मनोविकलतेमुळे किंवा नशेमुळे असमर्थ असेल तर; अथवा
(c) ग) (क) बारा वर्षांखालील व्यक्तीने संमती दिलेली असता आणि संदर्भावरून काही विरूध्द दिसून येत नसेल तर,
अशी संमती या संहितेच्या कोणत्याही कलमाला उद्देशित असलेली अशी संमती नव्हे.
Pingback: Ipc कलम ९० : भयापोटी किंवा गैरसमजापोटी संमती दिली असल्याची