Bns 2023 कलम २८३ : फसवा प्रकाश, चिन्ह किंवा बोया दाखविणे :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २८३ :
फसवा प्रकाश, चिन्ह किंवा बोया दाखविणे :
कलम : २८३
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : फसवा प्रकाश, चिन्ह किंवा बोया दाखवणे.
शिक्षा : ७ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड जो १०००० रुपयांपेक्षा कमी नसेल.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
जर कोणी कोणताही फसवा प्रकाश, चिन्ह किंवा बोया दाखवला आणि तसे करण्यामागे एखाद्या नाविकाची दिशाभूल व्हावी असा त्याचा उद्देश असेल, किंवा तसे होणे संभवनीय असल्याची त्याला जाणीव असेल तर त्याला, सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा, आणि दहा हजार रुपयांपेक्षा कमी नसेल इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल.

Leave a Reply