भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २८१ :
सार्वजनिक रस्त्यावर बेदरकारपणे वाहन हाकणे किंवा सवारी करणे :
कलम : २८१
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : ज्यामुळे मानवी जीवित धोक्यात येणे, इत्यादी गोष्टी होतील इतक्या बेफामपणे किंवा हयगयीने सार्वजनिक रस्त्यावरुन वाहन हाकणे किंवा सवारी करणे.
शिक्षा : ६ महिन्यांचा कारावास, किंवा १००० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
ज्यामुळे मानवी जीवित धोक्यात येईल अथवा अन्य कोणत्याही व्यक्तीला दुखापत, अगर क्षती (नुकसान) पोचण्याचा संभव असेल इतक्या बेदरकारपणे किंवा हयगयीने जो कोणी कोणत्याही सार्वजनिक रस्त्यावरून एखादे वाहन हाकील किंवा सवारी करील त्याला, सहा महिन्यांपर्यंत इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा, किंवा एक हजार रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.