Bns 2023 कलम २७० : सार्वजनिक उपद्रव :

भारतीय न्याय संहिता २०२३
प्रकरण १५ :
सार्वजनिक (लोक) आरोग्य, सुरक्षितता, सोय, सभ्यता व नीतिमत्ता यांना बाधक अशा अपराधांविषयी :
कलम २७० :
सार्वजनिक उपद्रव :
जिच्यामुळे जनतेला अथवा जे आजूबाजूस राहतात किंवा तेथील मालमत्तेच्या ठिकाणी ज्यांची वहिवाट आहे अशा सरसकट सर्व लोकांना सामाईकपणे होणारी क्षती (नुकसान), धोका अगर त्रास होतो अथवा ज्यांना कोणताही सार्वजनिक हक्क वापरण्याचा प्रसंग येईल त्या व्यक्तींना क्षती (नुकसान), अटकाव, धोका किंवा त्रास होणे अपरिहार्य आहे अशी कोणतीही कृती करणारी किंवा अशा कोणत्याही अवैध (बेकायदेशीर) अकृतीबद्दल दोषी असणारी व्यक्ती सार्वजनिक उपद्रवाबद्दल दोषी असते परंतु सामाईक उपद्रवामुळे काही सोय किंवा फायदा होतो या कारणावरून तो माफ होत नाही.

This Post Has One Comment

Leave a Reply