भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २६८ :
न्यायसहायकाची बतावणी करून तोतयागिरी करणे :
कलम : २६८
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : न्यायसहायकाची (असेसर) बतावणी करुन तोतयेगिरी करणे.
शिक्षा : २ वर्षाचा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
न्यायसहायक म्हणून निवडून येण्यास, नामिकाप्रविष्ट होण्यास किंवा शपथ दिली जाण्यास विधित: (कायदेशीर) हक्कदार नाही हे स्वत:स माहीत असेल अशा कोणत्याही प्रकरणी तोतयेगिरी करून किंवा अन्यथा जो कोणी अशा प्रकारे स्वत: निवडूक येण्याची, नामिकाप्रविष्ट होण्याची किंवा स्वत:स शपथ दिली जाण्याची उद्देशपूर्वक व्यवस्था करील अथवा जाणीवपूर्वक तसे होऊ देईल अथवा तो स्वत: अशा रीतीने बेकायदा निवडून आलेला आहे, नामिकाप्रविष्ट झालेला आहे, किंवा आपणास तशी शपथ दिली गेलेली आहे हे माहीत असून, असा न्यायसहायक म्हणून इच्छापूर्वक काम करील त्याला, दोन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा, किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.
Pingback: Ipc कलम २२९ : ज्यूरी सदस्याची किंवा न्यायसहायकाची बतावणी