Bns 2023 कलम २६१ : लोकसेवकाने हयगयीने बंदिवासातून किंवा हवालतीमधून पळून जाऊ देणे :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २६१ :
लोकसेवकाने हयगयीने बंदिवासातून किंवा हवालतीमधून पळून जाऊ देणे :
कलम : २६१
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : लोकसेवकाने हयगयीने बंदिवासातून पळून जाऊ देणे.
शिक्षा : २ वर्षांचा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
जो कोणी लोकसेवक असून एखाद्या अपराधाचा दोषारोप असलेल्या किंवा त्याबद्दल सिद्धदोष ठरलेल्या (शिक्षा झालेल्या) किंवा कायदेशीरपणे हवालतीमध्ये पाठवण्यात आलेल्या एखाद्या व्यक्तीला बंदिवासात ठेवण्यास तो असा लोकसेवक म्हणून विधित: (कायद्याने) बद्ध (बांधलेला) असताना हायगयीने अशा व्यक्तीला बंदिवासातून पळून जाऊ देईल त्याला, दोन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या साध्या कारावासाची, किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.

This Post Has One Comment

Leave a Reply