Bns 2023 कलम २५२ : चोरीला गेलेली मालमत्ता परत मिळविण्याकामी मदत करण्याबद्दल देणगी घेणे इत्यादी :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २५२ :
चोरीला गेलेली मालमत्ता परत मिळविण्याकामी मदत करण्याबद्दल देणगी घेणे इत्यादी :
कलम : २५२
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : एखाद्या अपराधामुळे एखाद्या व्यक्तीला ज्या जंगम मालमत्तेपासून वंचित व्हावे लागले असेल, ती परत मिळवण्याच्या कामी मदत करण्यासाठी अपराध्याला गिरफदार न करवता देणगी घेणे.
शिक्षा : २ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
या संहितेखाली (कायद्याखाली) (भारतीय दंड संहिता) शिक्षापात्र असलेल्या एखाद्या अपराधामुळे ज्या कोणत्याही जंगम मालमत्तेपासून एखाद्या व्यक्तीला वंचित व्हावे लागले आहे ती परत मिळविण्याकामी तिला मदत करण्याचे निमित्त (कारण) दाखवून किंवा अशी मदत करण्याखातर जो कोणी कोणतीही लाच (परितोषण) घेईल, घेण्याचे कबूल करील किंवा त्यास संमती देईल त्याला, त्याने अपराधी गिरफदार होऊन अपराधाबद्दल सिद्धदोष (शिक्षा व्हावी) ठरावा यासाठी आपल्या शक्तीनुसार सर्व साधनांचा अवलंब केला नाही तर, दोन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.

This Post Has One Comment

Leave a Reply