भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २४६ :
न्यायालयात अप्रामाणिकपणे खोटा मागणी हक्क सांगणे:
कलम : २४६
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : न्यायालयात खोटा मागणी हक्क सांगणे.
शिक्षा : २ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
एखादा मागणी हक्क खोटा असल्याचे स्वत:ला माहीत असून जो कोणी कपटीपणाने किंवा अप्रामाणिकपणाने अगर एखाद्या व्यक्तीला क्षती (नुकसान) पोचवण्याच्या किंवा त्रास देण्याचा उद्देशाने न्यायालयामध्ये तो हक्क सांगेल त्याला, दोन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
Pingback: Ipc कलम २०९ : न्यायालयात अप्रामाणिकपणे खोटा मागणी हक्क