भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २४५ :
देय नसलेल्या रकमेसाठी कपटीपणाने हुकुमनामा होऊ देणे :
कलम : २४५
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : देय नसलेल्या रकमेसाठी हुकूमनामा मिळवणे किंवा हुकूमनाम्याची पूर्ती झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी घडवून आणणे.
शिक्षा : २ वर्षांचा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
एखादा व्यक्तीच्या दाव्यामध्ये, जो कोणी अशा व्यक्तीला देय नसलेल्या रकमेसाठी किंवा अशा व्यक्तीला देय असलेल्याहून अधिक रकमेसाठी अथवा, ज्या कोणत्याही मालमत्तेला किंवा तिच्यातील ज्या हितसंबंधाला अशी व्यक्ती हक्कदार नाही त्यासाठी स्वत:विरूध्द कपटीपणाने एखादा हुकुमनामा किंवा आदेश करवील किंवा होऊ देईल, तसेच एखाद्या हुकुमनाम्याची किंवा आदेशाची पूर्ती करण्यात आल्यानंतर किंवा ज्या संबंधात त्याची पूर्ती करण्यात आली आहे त्या गोष्टीबाबत स्वत:विरूध्द कपटीपणाने त्या हुकुमनाम्याची किंवा आदेशाची अंमलबजावणी करवील किंवा होऊ देईल त्याला, दोन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.
उदाहरण :
(क) हा (य) विरुद्ध दावा लावतो. (क) आपल्याविरुद्ध हुकूमनामा मिळवण्याचा संभव आहे यांची जाणीव असताना (य) स्वत:विरुद्ध ज्याला न्याय्य मागणीहक्क नाही अशा (ख) च्या दाव्यात कपटीपणाने आपल्याविरुद्ध अधिक मोठ्या रकमेचा न्यायनिर्णय होऊ देतो, जेणेकरुन (क) च्या हुकमनाम्याअन्वये (य) च्या मालमत्तेची जी विक्री होईल तिच्यापासूनच्या मिळणाऱ्या उत्पन्नात (ख) ला स्वत:करता किंवा (य) च्या फायद्यासाठी हिस्सा घेता यावा. (य) ने या कलमाखाली अपराध केला आहे.
Pingback: Ipc कलम २०८ : देय नसलेल्या रकमेसाठी कपटीपणाने हुकुमनामा