Bns 2023 कलम २४२ : दाव्यातील किंवा खटल्यातील कोणत्याही कृतीच्या किंवा कामाकाजाच्या प्रयोजनार्थ तोतयागिरी करणे :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २४२ :
दाव्यातील किंवा खटल्यातील कोणत्याही कृतीच्या किंवा कामाकाजाच्या प्रयोजनार्थ तोतयागिरी करणे :
कलम : २४२
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : दाव्यातील किंवा फौजदारी खटल्यातील कोणत्याही कृतीच्या किंवा कामकाजाच्या प्रयोजनार्थ अथवा जामीनदार किंवा प्रतिभूती बनण्यासाठी तोतयेगिरी करणे.
शिक्षा : ३ वर्षांचा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
जो कोणी कोणत्याही दाव्यात किंवा फौजदारी खटल्यात दुसऱ्याची बतावणी करून तोतयेगिरी करील आणि बनावट भूमिकेत कोणतीही कबुली देईल, अगर कथन करील, अथवा न्यायनिर्णयास कबुली देईल अथवा कोणतीही आदेशिका काढवील अथवा जामीनदार बनेल अगर जामीन राहील अथवा अन्य कोणतीही कृती करील त्याला, तीन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.

This Post Has One Comment

Leave a Reply