भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २३६ :
जे अधिकथन (अभिकथन) विधित: (कायद्याने) पुरावा म्हणून स्वीकार्य (मान्य) आहे त्यात केलेले खोटे कथन :
कलम : २३६
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : जे कोणतेही अधिकथन कायद्यानुसार पुरावा म्हणून स्वीकार्य आहे त्यात केलेले खोटे कथन.
शिक्षा : खोटा पुरावा देण्याबद्दल किंवा रचण्याबद्दल असेल तीच.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : खोटा पुरावा देण्याचा अपराध ज्या न्यायालयात विचारणीय असेल ते न्यायालय.
———
जे अधिकथन (अभिकथन) कोणत्याही तथ्याचा पुरावा म्हणून स्वीकारण्यास विधित: (कायद्याप्रमाणे) कोणतेही न्यायालय किंवा कोणीही लोकसेवक किंवा इतर व्यक्ती बद्ध (बांधलेली) किंवा प्राधिकृत असेल असे कोणतेही अधिकथन (अभिकथन) करून किंवा स्वाक्षरित करुन जर कोणी, ज्यासाठी ते अधिकथन (अभिकथन) वापरण्यात आले किंवा करण्यात आले त्या उद्दिष्टाच्या दृष्टीने एखाद्या महत्वाच्या मुद्दयाबाबत जे खोटे आहे अथवा जे खोटे असल्याचे स्वत:ला माहीत आहे किंवा तसे स्वत: समजतो किंवा जे खरे आहे असे स्वत: समजत नाही, असे कोणतेही कथन त्यात केले तर त्याला जणू काही त्याने खोटा पुरावा दिलेला असावा त्याप्रमाणे त्याच रीतीने शिक्षा होईल.
Pingback: Ipc कलम १९९ : जे अधिकथन विधित: (कायद्याने) पुरावा म्हणून