Bns 2023 कलम २२७ : खोटा पुरावा देणे :

भारतीय न्याय संहिता २०२३
प्रकरण १४ :
खोटा पुरावा आणि सार्वजनिक (लोक) न्यायाच्या विरोधी अपराधांविषयी :
कलम २२७ :
खोटा पुरावा देणे :
स्वत: सत्यकथन करण्यास शपथेमुळे किंवा कायद्याच्या एखाद्या स्पष्ट उपबंधामुळे विधित: (कायद्याने) बद्ध (बांधलेली) असून अथवा कोणत्याही विषयासंबंधी एखादे अधिकथन (निवेदन) करण्यास विधित: (कायद्याने) बद्ध (बांधलेली) असून जर कोणी जे खोटे आहे, अगर जे खोटे असल्याचे त्यास माहीत आहे, किंवा तसे तो समजतो असे अगर जे खरे आहे असे तो समजत नाही असे कोणतेही कथन केले तर, त्याने खोटा पुरावा दिला असे म्हटले जाईल.
स्पष्टीकरण १:
कथन शाब्दिक केलेले असो वा अन्यथा केलेले असो, ते या कलमाच्या अर्थकक्षेत येते.
स्पष्टीकरण २:
साक्षांकान करणाऱ्या व्यक्तीचे आपल्या समजूतीबाबते खोटे कथन हे या कलमाच्या अर्थकक्षेत येते, आणि ज्या गोष्टीव आपला विश्वास गोष्टीवर आपला विश्वास नाही ती तशी असल्याचे समजतो असे कथन करण्याने, तसेच जी गोष्ट आपल्याला माहीत नाही, ती आपणास माहीत आहे असे कथन करण्यानेही एखादी व्यक्ती (या दोन्ही घटना) खोटा पुरावा दिल्याबद्दल दोषी होऊ शकेल.
उदाहरणे :
(a) क) (ख) ला (य) विरुद्ध एक हजार रुपयांबाबत जो न्याय्य मागणीहक्क आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी संपरीक्षेच्या वेळी (क) हा, (ख) च्या हक्काचा न्याय्यपणा (य) कबूल करत असताना आपण ते ऐकले असे शपथेवर खोटे सांगतो. (क) ने खोटा पुरावा दिलेला आहे.
(b) ख) सत्य कथन करण्यास शपथेने बद्ध असून (क) हा, विवक्षित स्वाक्षरी ही (य) च्या हस्ताक्षरात आहे असे तो समजत नसताना ते (य) चे हस्ताक्षर आहे असे आपण समजतो असे कथन करतो. या बाबतीत, (क) स्वत:ला जे खोटे असल्याचे माहीत आहे ते कथन करतो, आणि म्हणून त्याने खोटा पुरावा दिलेला आहे.
(c) ग) (य) च्या हस्ताक्षराचे एकंदर वळण माहीत असताना (क) हा, विवक्षित स्वाक्षरी (य) च्या हस्ताक्षरात आहे अशा प्रामाणिक समजुतीने, ती (य) च्या हस्ताक्षरात असल्याचे आपण समजतो असे कथन करतो. याबाबतीत, (क) चे कथन हे फक्त त्याच्या समजुतीसंबंधी आहे आणि त्याच्या समजुतीपुरतेच सत्य आहे, आणि म्हणून ती स्वाक्षरी जरी (य) च्या हस्ताक्षरातील नसली तरीही, (क) ने खोटा पुरावा दिलेला नाही.
(d) घ) सत्य कथन करण्यास शपथेने बद्ध असताना व त्याविषयी काही माहिती नसताना (क) हा, विशिष्ट दिवशी (य) विशिष्ट ठिकाणी होता हे आपणांस माहीत आहे असे कथन करतो. (य) हा निर्दिष्ट दिवशी आणि त्या ठिकाणी असो वा नसो – (क) ने खोटा पुरावा दिलेला आहे.
(e) ङ) अर्थविवरणकार किंवा भाषांतरकार (क) ज्याचे यथार्थ अर्थविवरण किंवा भाषांतर करण्यास तो शपथेने बद्ध आहे त्या कथनाचे किंवा दस्तऐवजाचे जे अर्थविवरण किंवा भाषांतर खरे नसून जे खरे आहे असे तो समजत नाही ते अर्थविवरण किंवा भाषांतर यथातथ्य म्हणून देतो किंवा प्रमाणित करतो. (क) ने खोटा पुरावा दिलेला आहे.

This Post Has One Comment

Leave a Reply