भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २२४ :
लोकसेवकाला क्षती (नुकसान) पोचवण्याचा धाक :
कलम : २२४
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : कोणतेही पदीय कार्य करण्याबद्दल किंवा करण्याचे वर्जिण्याबद्दल लोकसेवकाचे मन वळवण्यासाठी त्यला किंवा तो जिच्यामध्ये हितसंबंधित असेल त्या व्यक्तीला क्षती पोचवण्याचा त्याला धाक घालणे.
शिक्षा : २ वर्षाचा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही .
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
आपल्या सार्वजनिक कार्याधिकारांच्या वापराशी निगडित अशी कोणतीही कृती करण्याबद्दल किंवा अशी कोणतीही कृती करण्यापाूसन परावृत्त राहण्याबद्दल, किंवा तिला विलंब (वेळ) लावण्याबद्दल कोणत्याही लोकसेवकाचे मन वळवण्यासाठी जो कोणी अशा लोक सेवकाला अगर तो लोक सेवक आपल्या समजुतीप्रमाणे जिच्यामध्ये हितसंबंधित आहे अशा कोणत्याही व्यक्तीला क्षती (नुकसान) पोचवण्याचा धाक घालील त्याला, त्याला दोन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा, किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.
Pingback: Ipc कलम १८९ : लोकसेवकाला क्षती (नुकसान) पोचवण्याचा धाक :