भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २०४ :
लोकसेवकाची बतावणी करून तोतयागिरी करणे :
कलम : २०४
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : लोकसेवकाची बतावणी करुन तोतयेगिरी करणे.
शिक्षा : सहा महिन्यापेक्षा कमी नसेल परंतु ३ वर्षाचा कारावास आणि द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
जो कोणी स्वत: लोकसेवक म्हणून कोणतेही विशिष्ट अधिकारपद धारण करत नाही, हे माहीत असताना असे अधिकारपद धारण करण्याचा बहाणा करील, अथवा असे अधिकारपद धारण करणाऱ्या अन्य कोणत्याही व्यक्तीची बतावणी करून तोतयेगिरी करील आणि अशा बनावट भूमिकेत असताना अशा पदाधिकाऱ्याच्या अमिषाने कोणतीही कृती करील किंवा तसा करण्याचा प्रयत्न करील तर त्यास, सहा महिन्यांपैकी कमी नसेल परंतु तीन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा, आणि द्रव्यदंडाची, शिक्षा होईल.
Pingback: Ipc कलम १७० : लोकसेवकाची बतावणी करून तोतयागिरी करणे :