भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २०३ :
लोकसेवकाने बेकायदेशीरपणे मालमत्ता विकत घेणे किंवा तिच्याकरिता बोली देणे :
कलम : २०३
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : लोकसेवकाने बेकायदेशीर मालमत्ता विकत घेणे किंवा त्यासाठी बोली देणे.
शिक्षा : २ वर्षाचा साधा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही व मालमत्ता खरेदी केली असेल तर ती जप्त केली जाईल.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र .
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
जो कोणी लोकसेवक असून आणि असा लोकसेवक म्हणून विवक्षित मालमत्ता खरेदी न करण्यास किंवा तिच्याकरिता बोली न करण्यास विधित: (कायद्याने) बद्ध असून, स्वत:च्या नावाने किंवा अन्य व्यक्तीच्या नावाने अथवा इतरांसह संयुक्तपणे किंवा भागीदारीत ती मिळकत खरेदी करील किंवा तिच्याकरिता बोली देईल त्याला दोन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची साध्या कारावासाची शिक्षा, किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील आणि मालमत्ता खरेदी केली असल्यास,ती अधिहरण (जप्त) केली जाईल.
Pingback: Ipc कलम १६९ : लोकसेवकाने बेकायदेशीरपणे मालमत्ता विकत घेणे..