भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २०१ :
क्षती (नुकसान) पोचविण्याच्या उद्देशाने लोकसेवकाने चुकीचे दस्तऐवज तयार करणे :
कलम : २०१
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : क्षती (नुकसान) पोचविण्याच्या उद्देशाने लोकसेवकाने चुकीचे दस्तऐवज तयार करणे.
शिक्षा : ३ वर्षांचा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
जर कोणी लोकसेवक असून आणि असा लोक सेवक म्हणून कोणताही दस्तऐवज अगर इलेक्ट्रॉनिक अभिलेक तयार करण्याची किंवा त्याचा अनुवाद करण्याची जबाबदारी त्याच्यावर असून, जी रीत चुकीची असल्याचे त्याला माहीत आहे किंवा तसे तो समजतो आणि त्या रीतीने (पध्दतीने) दस्तऐवज तयार करतो किंवा अनुवाद करतो आणि त्याद्वारे कोणत्याही व्यक्तीला क्षती (नुकसान) पोचावी असा त्याचा उद्देश असेल किंवा तशी क्षती (नुकसान) आपणांकडून पोचणे संभवनीय असल्याची त्याला जाणीव असेल, तर त्यास तीन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची, किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.
Pingback: Ipc कलम १६७ : क्षती पोचविण्याच्या उद्देशाने लोकसेवकाने