भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २०० :
पीडित व्यक्ती चा उपचार न केल्यास शिक्षा :
कलम : २००
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : पीडित व्यक्तीवर रुग्णानलयांनी उपचार न करणे.
शिक्षा : १ वर्षाचा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही .
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
जो कोणी, सरकारी किंवा खाजगी रूग्णालयाचा, -मग ते केंद्र शासनाकडून चालविण्यात येत असो, राज्य शासनाकडून चालविण्यात येत असो, स्थानिक मंडळाकडून चालविण्यात येत असो किंवा इतर कोणत्याही व्यक्तीकडून चालविण्यात येत असो – प्रभारी असताना, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ याच्या कलम ४५९ च्या तरतुदीचे उल्लंघन करील, त्याला एक वर्षापर्यंंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची किंवा दंडाची किंवा दोन्ही शिक्षा देण्यात येतील.
Pingback: Ipc कलम १६६ ब : पीडित व्यक्ती चा उपचार न केल्यास शिक्षा :