भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १९९ :
लोकसेवकाने, कायद्यान्वये दिलेल्या निदेशांची अवज्ञा करणे :
कलम : १९९
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : लोकसेवकाने, कायद्यान्वये दिलेल्या निदेशांची अवज्ञा करणे.
शिक्षा : सहा महिन्यापेक्षा कमी नसेल परंतु २ वर्षाचा कठोर कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
(a) क)एखाद्या अपराधाच्या अन्वेषणाच्या किंवा इतर कोणत्याही बाबीच्या प्रयोजनासाठी एखाद्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीस उपस्थित राहण्यास फर्मावण्यास कायद्याच्या कोणत्याही निदेशानुसार प्रतिबंध असताना जाणीवपूर्वक त्या निदेशाची अवज्ञा करील, किंवा
(b) ख)तो ज्यामध्ये असे अन्वेषण करील त्याबाबतीतली रीत विनियमित करणाऱ्या कायद्याच्या इतर कोणत्याही निदेशाची, कोणत्याही व्यक्तीला बाधा पोहोचण्यासाठी अवज्ञा करील, किंवा
(c) ग) कलम ६४, कलम ६५, कलम ६६, कलम ६७ किंवा कलम ६८ किंवा कलम ७०, कलम ७१, कलम ७४, कलम ७६, कलम ७७, कलम ७९, कलम १२४ किंवा कलम १४३ किंवा कलम १४४ अन्वये शिक्षा योग्य असलेल्या दखली अपराधाच्या संबंधात, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ याच्या कलम १७३ च्या पोटकलम (१) त्याला दिलेली माहिती नोंदवून घेण्यात कसूर करील,
त्याला सहा महिन्यांपेक्षा कमी नसेल परंतु दोन वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या सश्रम कारावासाची शिक्षा देण्यात येईल आणि तो द्रव्यदंड केला जाण्यासही पात्र असेल.
Pingback: Ipc कलम १६६-अ : लोकसेवकाने, कायद्यान्वये दिलेल्या निदेशांची