Bns 2023 कलम १९७ : राष्ट्रीय एकात्मतेला बाधक असे अभ्यारोप (आरोप), प्रपादने (निवेदने) करणे:

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १९७ :
राष्ट्रीय एकात्मतेला बाधक असे अभ्यारोप (आरोप), प्रपादने (निवेदने) करणे:
कलम : १९७ (१)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : राष्ट्रीय एकात्मतेला बाधक असे अभ्यारोप, प्रपादने.
शिक्षा : ३ वर्षाचा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
कलम : १९७ (२)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : सार्वजनिक उपासनास्थान, इत्यादी ठिकाणी तसे केल्यास.
शिक्षा : ५ वर्षाचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
१) तोंडी किंवा लेखी शब्दांमार्फत अथवा खुणांमार्फत अगर दृश्य प्रतिरुपणांद्वारे (देखाव्यामार्फत) अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमा द्वारे अथवा अन्य प्रकारे जर कोणी, –
(a) क) (अ) एखाद्या वर्गातील व्यक्ती एखाद्या धार्मिक, वांशिक, भाषिक किंवा प्रादेशिक गटाच्या अगर जातीच्या अगर जनसमाजजाच्या सदस्य असल्याकारणाने त्या व्यक्ती कायद्याद्वारे प्रस्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबाबत खरी श्रध्दा व निष्ठा बाळगू शकत नाहीत, अथवा भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखू शकत नाहीत असा अभ्यारोप (आरोप) केला किंवा प्रकाशित केला गेला तर, अथवा
(b) ख) (ब) एखाद्या वर्गातील व्यक्ती एखाद्या धार्मिक, वांशिक, भाषिक किंवा प्रादेशिक गटाच्या अगर जातीच्या अगर जनसमाजाच्या सदस्य असल्याकारणाने त्यांना भारताचे नागरिक म्हणून त्यांचे हक्क नाकारले जावेत किंवा त्यापासून त्यांना वंचित करावे, असे प्रपादन केले, असा सल्ला दिला, उपदेश केला, प्रचार केला, किंवा असे प्रकाशित केले तर; अथवा
(c) ग) (क) एखाद्या वर्गातील व्यक्ती एखाद्या धार्मिक, वांशिक, भाषिक किंवा प्रादेशिक गटाच्या अगर जातीच्या अगर जनसमाजाच्या सदस्य असल्याकारणाने त्यांच्यावर असलेल्या आबंधनासंबंधी कोणतेही प्रपादन, सल्ला, युक्तिवाद किंवा आवाहन केले किंवा प्रकाशित केले, आणि असे प्रपादन, सल्ला, युक्तिवाद किंवा आवाहन यामुळे असे सदस्य व इतर व्यक्ती यांच्या दरम्यान तेढ अथवा शत्रुत्वाच्या किंवा द्वेषाच्या किंवा दृष्टाव्याच्या भावना निर्माण झाल्या किंवा निर्माण होणे संभवनीय असले तर; अथवा
(d) घ) (ड) भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता किंवा सुरक्षेला बाधा आणणारी खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती दिली किंवा प्रकाशित केली तर,
त्याला तीन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या कारावासाची किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.
२) जो कोणी वरील पोटकलम (१) मध्ये विनिर्दिष्ट केलेला असा एखादा अपराध कोणत्याही उपासनास्थानी अथवा धार्मिक उपासना किंवा धार्मिक संस्कारविधी करण्यात गुंतलेल्या एखाद्या जमावामध्ये करील त्याला पाच वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.

This Post Has One Comment

Leave a Reply