भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १९५ :
लोकसेवक जेव्हा दंगा वगैरे शमवीत असताना त्याच्यावर हमला करणे किंवा त्याला अटकाव करणे (हरकत घेणे) :
कलम : १९५ (१)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : लोकसेवक दंगा इत्यादी शमवीत असताना त्याच्यावर हमला करणे किंवा त्याला अटकाव करणे.
शिक्षा : ३ वर्षाचा कारावास, किंवा द्रव्यदंड जो २५००० रुपयांपेक्षा कमी नसेल, किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : जमानतीय
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———-
कलम : १९५ (२)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : लोकसेवक दंगा इत्यादी शमवीत असताना, त्याला अटकाव करण्याचा प्रयत्न करणे किंवा फौजदारीपात्र बलप्रयोगाची धमकी देणे.
शिक्षा : १ वर्षाचा कारावास, किंवा द्रव्यदंड , किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : जमानतीय
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
१) एखादा लोकसेवक बेकायदेशीर जमाव पांगण्याचा अथवा दंगा किंवा दंगल शमविण्याचा प्रयत्न करुन असा लोक सेवक म्हणून आपले कर्तव्य पार पाडताना, जो कोणी त्यांच्यावर हमला (अंगावर धावणे) करील किंवा अटकाव करील अथवा अशा लोकसेवकांवर फौजदारीपात्र बलप्रयोग करील त्याला, तीन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा किंवा पंचवीस हजार रुपयांपेक्षा कमी नसेल इतक्या द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.
२) एखादा लोकसेवक बेकायदेशीर जमाव पांगण्याचा अथवा दंगा किंवा दंगल शमविण्याचा प्रयत्न करुन असा लोक सेवक म्हणून आपले कर्तव्य पार पाडताना, अटकाव करण्याचा प्रयत्न करील, अथवा अशा लोकसेवकांवर फौजदारीपात्र बलप्रयोग करण्याची धमकी देईल, किंवा तसा प्रयत्न करील त्याला, एक वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.
Pingback: Ipc कलम १५२ : लोकसेवक जेव्हा दंगा वगैरे शमवीत असताना