भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १९४ :
दंगल (मारामारी) :
कलम : १९४ (२)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : दंगल करणे.
शिक्षा : १ महिन्यांचा कारावास, किंवा १००० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही .
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
१) जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी मारामारी करून सार्वजनिक शांतता बिघडवितात तेव्हा, त्यांनी दंगल केली (मारामारी) असे म्हटले जाते.
२) जो कोणी दंगल (मारामारी) करील त्याला एक महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची, किंवा एक हजार रूपये द्रव्यदंडापर्यंत किंवा दोन्ही शिक्षा होतील.
Pingback: Ipc कलम १५९ : दंगल (मारामारी) : – Ajinkya Innovations