भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १८ :
कायदेशीर कृती करताना अपघात :
कायदेशीर रीतीने, कायदेशीर साधनांनी आणि योग्य ती काळजी व खबरदारी घेऊन एखादी कायदेशीर कृती करत असताना अपघाताने किंवा दुदैंवाने आणि कोणताही गुन्हेगारी उद्देश किंवा जाणीव नसताना जी गोष्ट (कृती) हातून घडते अशी कोणतीही गोष्ट (कृती) अपराध होत नाही.
उदाहरण :
(क) हा कुऱ्हाडीने काम करत असतो, तिचा मुंढा उडतो आणि बाजूस उभ्या असलेल्या माणसाला लागून तो मरतो. येथे, (क) कडून योग्य खबरदारी घेण्यात कसूर झाली नसेल तर, त्याची कृती क्षम्य आहे आणि ती अपराध होत नाही.
Pingback: Ipc कलम ८० : कायदेशीर कृती करताना अपघात :