भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १८७ :
टाकसाळीत कामाला असलेल्या व्यक्तीने कायद्यानुसार ठरलेल्याहून निराळ्या वजनाचे किंवा मिश्रणाचे नाणे घडवणे:
कलम : १८७
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : टाकसाळीत कामाला असलेल्या व्यक्तीने कायद्यानुसार ठरलेल्याहून निराळ्या वजनाचे किंवा मिश्रणाचे नाणे घडवणे.
शिक्षा : ७ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
जो कोणी भारतात कायदेशीरपणे स्थापन झालेल्या कोणत्याही टाकसाळीत कामास असून, त्या टाकसाळीतून निघणाऱ्या कोणत्याही नाण्यासाठी कायद्याने ठरलेल्याहून निराळ्या वजनाचे किंवा मिश्रणाचे कोणतेही नाणे घडवण्याच्या उद्देशाने कोणतीही कृती करील, किंवा ते करण्यास तो विधित: (कायद्याने) बद्ध (बांधलेला) आहे ते करण्याचे टाळील त्याला सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
Pingback: Ipc कलम २४४ : टाकसाळीत कामाला असलेल्या व्यक्तीने कायद्या