भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १८४ :
जो आधी वापरण्यात आलेला असल्याचे माहीत आहे असा शासकीय मुद्रांक वापरणे :
कलम : १८४
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : जो आधी वापरण्यात आलेला असल्याचे माहीत आहे असा शासकीय मुद्रांक वापरणे.
शिक्षा : २ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड, किंवा दोन्ही
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
कपटीपणाने किंवा शासनास हानी पोचवण्याच्या उद्देशाने जो कोणी महसूलाच्या प्रयोजनार्थ (कारणासाठी) शासनाद्वारे पुर:सृत (काढलेला) असा जो मुद्रांक आधी वापरण्यात आलेला असल्याचे स्वत:ला माहीत आहे तो मुद्रांक कोणत्याही प्रयोजनार्थ (कारणाकरिता) वापरील त्याला, दोने वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.
Pingback: Ipc कलम २६२ : जो आधी वापरण्यात आलेला असल्याचे माहीत आहे असा