भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १८३ :
शासनास हानी पोचवण्याच्या उद्देशाने, शासकीय मुद्रांक लावलेल्या पदार्थावरील लेख पुसून टाकणे किंवा एखाद्या दस्तऐवजासाठी वापरलेला मुद्रांक दस्तऐवजावरून काढून टाकणे :
कलम : १८३
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : शासनास हानी पोचवण्याच्या उद्देशाने शासकीय मुद्रांक लावलेल्या पदार्थावरील कोणताही लेख पुसून टाकणे किंवा एखाद्या दस्तऐवजासाठी वापरलेला मुद्रांक त्यावरुन काढून टाकणे.
शिक्षा : ३ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड, किंवा दोन्ही
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
कपटीपणाने शासनास हानी पोचवण्याच्या उद्देशाने जो कोणी महसूलाच्या प्रयोजनार्थ (कारणाकरिता) शासनाद्वारे पुर:सृत (काढलेला) असा कोणताही मुद्रांक लावलेल्या कोणत्याही पदार्थावरील ज्याच्यासाठी असा मुद्रांक वापरण्यात आलेला आहे असा कोणताही लेख किंवा दस्तऐवज काढून टाकील किंवा पुसून टाकील अथवा कोणत्याही लेखासाठी किंवा दस्तऐवजासाठी जो मुद्रांक वापरला असेल तो वेगळ्या लेखासाठी किंवा दस्तैवजासाठी वापरता यावा म्हणून अशा लेखावरून किंवा दस्तऐवजावरून तो मुद्रांक काढून टाकील त्याला, तीन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची दोन्ही पैकी कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा, किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.
Pingback: Ipc कलम २६१ : शासनास हानी पोचवण्याच्या उद्देशाने, शासकीय