भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १८१ :
नाणे, सरकारी स्टाम्प, चलनी नोटा किंवा बँक नोट नकली तयार करण्याचे साधन किंवा उपकरण बनविणे किंवा कब्जात बाळगणे :
कलम : १८१
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : नाणे, सरकारी स्टाम्प, चलनी नोटा किंवा बँक नोट नकली तयार करण्याचे साधन किंवा उपकरण बनविणे किंवा कब्जात बाळगणे.
शिक्षा : आजीवन कारावास किंवा १० वर्षाचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
जो कोणी, एखादा साचा किंवा साधन हे, नाणे, महसूलाच्या प्रयोजनार्थ शासनाद्वारे काढलेला कोणताही मुद्रांक, चलनी नोट किंवा बँक नोट, नकली तयार करण्यासाठी त्याचा वापर व्हावा यासाठी, किंवा तसा वापर होण्याचे उद्देशित आहे ते माहित असताना किंवा तसे समजण्यास कारण असताना बनवील किंवा नीट करील अथवा ते बनवण्याच्या किंवा नीट करण्याच्या प्रक्रियेतील कोणताही भाग पार पाडील अथवा ते विकत घेईल, ते विकेल किंवा त्याची वासलात लावील किंवा ते कब्जात बाळगिल, त्याला आजीवन कारावासाची किंवा दहा वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची दोन्ही पैकी कोणत्याही तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
Pingback: Ipc कलम २३३ : नकली नाणे तयार करण्याचे साधन बनविणे किंवा
Pingback: Ipc कलम २३४ : भारतीय नाणे नकली तयार करण्याचे साधन बनवणे
Pingback: Ipc कलम २३५ : नकली नाणे तयार करण्याच्या कामी वापरण्याकरिता
Pingback: Ipc कलम २५६ : शासकीय मुद्रांक नकली तयार करण्यासाठी
Pingback: Ipc धारा २५७ : सरकारी स्टाम्प (मुद्रांकित पत्र)के कूटकरण के
Pingback: Ipc कलम २५७ : शासकीय मुद्रांक नकली तयार करण्यासाठी साधन..