भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १७ :
विधित: (कायद्याचे) समर्थन मिळालेल्या किंवा तसे स्वत:ला समर्थन आहे असे तथ्यविषयक चूकभुलीमुळे समजणाऱ्या व्यक्तीने केलेले कृती :
एखादी कृती करण्यास ज्या व्यक्तीला विधित: (कायद्याने) समर्थन मिळालेले आहे किंवा जी व्यक्ती ती कृती करण्यात आपल्याला विधित: समर्थन आहे असे विधिविषयक चुकभूलीमुळे नव्हे तर तथ्यविषयक चूकभूलीमुळे सद्भावपूर्वक समजते अशा व्यक्तीने केलेली ती गोष्ट (कृती) अपराध होत नाही.
उदाहरण :
(क) ला जी गोष्ट खून असल्याचे वाटते ती गोष्ट (य) करत असताना (क) त्याला पाहतो. प्रत्यक्षात खून करणाऱ्या व्यक्तींना पकडण्याचा जो अधिकार कायद्याने सर्व व्यक्तींना दिलेला आहे त्याचा सद्भावपूर्वक चालवलेल्या आपल्या सर्वोत्तम निर्णयबुद्धीनुसार वापर करुन (क) हा (य) ला योग्य प्राधिकाऱ्यांसमोर आणण्यासाठी त्याला सक्तीने ताब्यात घेतो. (य) स्वसंरक्षणार्थ तसे करत होता असे मागाहून आढळून आले तरीही, (क) ने काहीही अपराध केलेला नाही.
Pingback: Ipc कलम ७९ : विधित: (कायद्याचे) समर्थन आहे मिळालेल्या किंवा