भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १७९ :
बनावट किंवा नकली नाणे, शासकीय मुद्रांक, चलनी नोट किंवा बँक नोट अस्सल म्हणून वापरणे :
कलम : १७९
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : बनावट किंवा नकली नाणे, शासकीय मुद्रांक, चलनी नोट किंवा बँक नोट अस्सल म्हणून वापरणे.
शिक्षा : आजीवन कारावास किंवा १० वर्षाचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
जो कोणी, नकली असल्याचे स्वत:ला माहित आहे किंवा तसे समजण्यास कारण आहे, कोणतेही बनावट किंवा नकली नाणे, कोणताही मुद्रांक, चलनी नोट किंवा बँक नोट, आयात किंवा निर्यात करेल किंवा विकेल किंवा वितरित करेल किंवा खरेदी किंवा कोणत्याही अन्य व्यक्ति कडून प्राप्त करील किंवा अन्यथा वाहतूक करिल किंवा असल्ल म्हणून वापरील त्याला दहा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची दोन्हीं पैकी कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र ठरेल.
Pingback: Ipc कलम २३७ : नकली नाण्याची आयात किंवा निर्यात :
Pingback: Ipc कलम २३८ : नकली भारतीय नाण्याची आयात किंवा निर्यात :
Pingback: Ipc कलम २३९ : कोणतेही नाणे नकली आहे याची जाणीव असताना
Pingback: Ipc कलम २४० : भारतीय नाणे नकली आहे याची जाणीव असताना
Pingback: Ipc कलम २५८ : नकली शासकीय मुद्रांकाची विक्री :
Pingback: Ipc कलम २६० : जो नकली आहे हे माहीत आहे असा शासकीय मुद्रांक