भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १७७ :
निवडणुकीचे हिशेब ठेवण्यास चुकणे :
कलम : १७७
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : निवडणुकीचे हिशेब ठेवण्यास चुकणे.
शिक्षा : ५००० रुपये द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
निवडणुकीमध्ये किंवा तिच्या संबंधात होणाऱ्या खर्चाचे आपण हिशेब ठेवणे त्या त्या काळी अमलात असलेल्या कोणत्याही कायद्यानुसार किंवा कायद्याप्रमाणे प्रभावी असलेल्या कोणत्याही नियमानुसार आवश्यक असताना जो कोणी असे हिशेब ठेवण्यास चुकेल त्याला पाचशे रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल.
Pingback: Ipc कलम १७१-आय : निवडणुकीचे हिशेब ठेवण्यास चुकणे :