भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १७५ :
निवडणुकीच्या संबंधात खोटे कथन :
कलम : १७५
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : निवडणुकीच्या संबंधात खोटे कथन.
शिक्षा : द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
निवडणुकीच्या निकालावर परिणाम करण्याच्या उद्देशाने जो कोणी, कोणत्याही उमेदवाराचे व्यक्तीगत चारित्र्य किंवा वर्तन यासंबंधात वस्तुस्थिती-कथन वाटणारे असे जे कथन खोटे असून आणि ते खोटे असल्याचे आपणांस माहीत असून किंवा तसे आपण समजत असून अगर ते खरे आहे असे आपण समजत नसताना, असे कोणतेही कथन करील किंवा प्रकाशित करील त्याला, द्रव्यदंडाची शिक्षा होईल.
Pingback: Ipc कलम १७१-ग : निवडणुकीच्या संबंधात खोटे कथन :