भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १७४ :
निवडणुकीत गैरवाजवी प्रभाव पाडण्याबद्दल किंवा तोतयागिरी करण्याबद्दल शिक्षा :
कलम : १७४
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : निवडणुकीत गैरवाजवी प्रभाव पाडणे.
शिक्षा : १ वर्षाचा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
जो कोणी निवडणुकीत गैरवाजवी प्रभाव पाडण्याचा किंवा तोतयागिरी करण्याचा अपराध करील त्याला, एक वर्षपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.