भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १७३ :
लाचलुचपती बद्दल शिक्षा :
कलम : १७३
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : लाचलुचपत.
शिक्षा : १ वर्षाचा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही, सरबराईच्याच स्वरुपात केली असेल तर फक्त द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
जो कोणी लाचलुचपतीचा अपराध करील त्याला एक वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची, किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.
परंतु सरबराईद्वारे लाचलुचपत असेल तर फक्त द्रव्यदंडच ठोठावण्यात येईल.
स्पष्टीकरण :
सरबराई याचा अर्थ खाद्यपेये, करमणूक किंवा सामग्रीपुरवठा या स्वरुपात परितोषण (लाचलुचपत) दिली जाते असा आहे.
Pingback: Ipc कलम १७१-इ : लाचलुचपती बद्दल शिक्षा :